“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ”
असे म्हणत २७ फेब्रुवारी लासेंट मेरीज शाळेत दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील’ मराठी भाषा गौरव दिवस’ दणक्यात साजरा झाला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते विवेक सांगळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडी ने झाली, त्यानंतर सरस्वती पूजन आणि वि. वा. शिरवाडकर यांना आदरांजली देण्यात आली.मराठी भाषा गौरव दिवसाचे महत्त्व सांगून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले गेले.शाळेतील सर्व शिक्षक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यावर्षी महाराष्ट्रातील वारकरी संस्कृती दर्शवण्यात आली.संत गोरा कुंभार यांच्यावर आधारित नाटिका तसेच लहान मुलांनी विठ्ठल विठ्ठल या गाण्यावर वारकरी नृत्य सादर केले. प्राथमिक वर्गातील लहान मुलांच्या मंगळागौर सादरीकारणामुळे तर कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच विविध राज्यांत बोलली जाणारी मराठी नाटीके मधून प्रस्तुत केली.प्रमुख पाहुणे विवेक सांगळे यांनी मुलांना मराठी भाषेचे महत्व सांगितले तसेच मुख्याध्यापक फादर फेलिक्स यांनी देखील आपल्या भाषणातून मुलांना मार्गदर्शन केले. अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.











