शतेशू जायते शूरः, सहस्त्रेषु च पण्डितः,
वक्ता दशसहस्त्रेषु, दाता भवति वा न वा ‘
संस्कृतमध्ये म्हटले आहे की शंभरात माणूस शूरवीर निपजतो, हजारातील माणूस हुशार निपजतो, दहा हजारातील माणूस उत्तम वक्ता निपजतो आणि दानशूर माणूस निपजणे तर फारच अवघड आहे.
ह्याचाच अर्थ असा की चांगले वक्तृत्व करणारी माणसे फार दुर्मिळ असतात. चांगले वक्तृत्व अंगी असण्यासाठी
बरेच गुण लागतात. सर्वात पहिला म्हणजे आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, त्या विषयाचा चांगला अभ्यास असावा लागतो. त्यानंतर सभेत सर्वांसमोर मांडावा लागतो म्हणूनच सेंट मेरीज शाळेत १२ डिसेंबर २०२३ रोजी मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.इयत्ता ५वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
विषयवार विभागणी:
इयत्ता ५वी : मी अभिनेता
६वी : मी पुढारी
७वी : एकपात्री अभिनय
८वी : म्हणींवर आधारित गोष्ट
९वी आणि १०वी : खुला विषय
स्पर्धा इयत्ता ५वी ते ७वी आणि ८वी ते १० वी अशा २ सत्रात घेण्यात आली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सेंट अग्नेस शाळेच्या शिक्षिका संगीता डिकुन्हा आणि सेंट मेरिज (आय. सी. एस. इ.) शाळेच्या मराठी विषय शिक्षिका हेलन फएनरोज उपस्थित होत्या.विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयानुसार आपले वकृत्व प्रभावीपणे मांडले. परीक्षकांनी देखिल मुलांचे कौतुक करून योग्य ते मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स आणि पर्यवेक्षिका शीला यांनी देखील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
स्पर्धेनंतर लगेच निकाल जाहीर करून मुलांना प्रमाणपत्र देण्यात आले.


