शिवजयंती हा एक अत्यंत महत्वाचा सण सेंट मेरीज शाळेतील मुलांनी, शिक्षकांनी, कर्मचाऱ्यांनी विशेष उत्साहात साजरा केला. शिवाजी महाराजांच्या वीरत्वाचे, सामर्थ्याचे आणि देशभक्तीचे स्मरण करताना विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळच्या नित्य परिपाठाने झाली.त्यानंतर मुख्याध्यापक फादर फेलिक्स डिसुझा आणि पर्यवेक्षिका शीला मॅडम यांच्या हस्ते महाराजांचे प्रतिमा पूजन केले. इयत्ता पाचवीच्या अथर्व गुरव याने गाणे सादर केले त्यानंतर इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी युगत मांडली या गण्या द्वारे शिवरायांची युद्धनीती नृत्यामधून मांडली. तसेच स्वरूप साळवे याने जिजामाता यांचे पात्र साकारून मुलांना शिवबासारखे होण्याचा संदेश दिला.
या सर्व कार्यक्रमांमधून शिवजयंतीचा उत्साह सर्वांपर्यंत पोहोचला.ह्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या महत्वाच्या घटकांचा विचार करण्याची संधी देतो.











