दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता सेंट मेरीज हायस्कूलच्या पटांगणात मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात परिपाठाने झाली. मान्यवरांचे स्वागत करून सरस्वती वंदना तसेच छत्रपती शिवाजी महाराज वंदना सादर करण्यात आली. त्यानंतर वि. वा. शिरवाडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मराठी ग्रंथ दिंडी ने कार्यक्रमाला औपचारिक प्रारंभ झाला.
प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी “संस्कृती महाराष्ट्राची” या विषयावर आकर्षक नाट्य सादर केले. मराठी राजभाषेचे महत्त्व स्पष्ट करणारे भाषण विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडले. तसेच “सण” या विषयावर नाटिका सादर करून महाराष्ट्राच्या परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवले. माध्यमिक विद्यार्थ्यांनी शेतकरी नृत्य तसेच पालकांनी कोळी नृत्य सादर करून कार्यक्रमाला बहार आणली.
प्रमुख पाहुणे श्री. मनोज पांडुरंग जामसुतकर (आमदार – भायखळा विधानसभा) व सौ. सोनम जामसुतकर( नगरसेविका )यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणातून त्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे व तिच्या जतनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पर्यवेक्षिकेचे मनोगत झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक फादर फेलिक्स डिसोजा यांनी आदरपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा व संस्कृतीबद्दल अभिमान आणि आपुलकी अधिक दृढ झाली.

 

Admissions Open
📢Notice Board
Admissions Open 2025-26: Applications now being accepted. Visit admissions page or contact school office. | 📅 Annual Day: July 15, 2026. All parents and guardians cordially invited. | 📝 Exam Schedule: First Term Examinations commence August 1, 2026. Collect hall tickets from office. | 🏆 Sports Day: September 10, 2026. Register with House Masters by August 20. | 🎓 PTA Meeting: June 25, 2026 at 9:00 AM. Attendance compulsory for all parents. | 🌟 Congratulations: 100% pass in SSC Board Examinations. Well done to all! | Admissions Open 2025-26: Applications now being accepted. Visit admissions page or contact school office. | 📅 Annual Day: July 15, 2026. All parents and guardians cordially invited. | 📝 Exam Schedule: First Term Examinations commence August 1, 2026. Collect hall tickets from office. | 🏆 Sports Day: September 10, 2026. Register with House Masters by August 20. | 🎓 PTA Meeting: June 25, 2026 at 9:00 AM. Attendance compulsory for all parents. | 🌟 Congratulations: 100% pass in SSC Board Examinations. Well done to all!
▮▮