शालेय मराठी वक्तृत्व स्पर्धा
आपल्या शाळेत दिनांक १६ डिसेंबर २०२२ रोजी शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. इयत्ता ५वी आणि ६ वी तील मुलांना स्पर्धेचा विषय होता, कोणतेही व्यक्तिमत्त्व सादरीकरण, ७वी च्या मुलांसाठी क्रांतिकारक, ८वी च्या मुलांसाठी भारतीय शास्त्रज्ञ तसेच ९वी आणि १० वी च्या मुलांसाठी मुक्त विषय असे स्पर्धेचे स्वरूप होते.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अँटोनी डिसिल्वा हायस्कूलच्या शिक्षिका शीतल डायस आणि रोजरी शाळेच्या शिक्षिका मराठी विषय शिक्षिका एस्ट्रेला यांना आमंत्रित केले होते.
सकाळी ९ वाजता स्पर्धेला सुरुवात झाली आणि दुपारी १२.३० वाजता स्पर्धा समाप्त झाली.
स्पर्धेच्या अंती प्रमुख पाहुण्यांनी मुलांना मार्गदर्शन केले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सौ.अॅनेट हेनरिक
आणि पर्यवेक्षक फा. फेलिक्स यांनी पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन मुलांना प्रोत्साहन दिले.

